शेगाव-अकोट मार्गावर विचित्र अपघात, पहिल्या अपघातातील मृतदेहाला दुचाकी धडकली, महिलेचाही मृत्यू

रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाला दुचाकी धडकली, विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू
Accident
AccidentSaam tv

बुलढाणा : शेगाव-आकोट राज्य महामार्गावर आज गुरुवारी सकाळी विचित्र अपघात झाला. अज्ञात वाहनाने (shegaon akot accident update) एका व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावरच असल्याने समोरून येणारी दुचाकी मृतदेहाला धडकली. दुर्देवाने या अपघातात दुचाकीवर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तरन्नुम खान असं मृत महिलेचं नाव आहे. दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू (two people death) झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident
Sonia Gandhi-Smriti Irani: सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक; खासदारांना हस्तक्षेप करावा लागला

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाववरून अकोटकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. त्यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीची त्या मृतदेहाला धडक बसल्याने खान दाम्पत्य खाली पडले.

Accident
NCB ची धडक कारवाई, मुंबईत गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या, १९० किलो गांजासह ४ जणांना अटक

तरन्नुम खान या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर खान यांना अकोला येथील रुग्णालयाकडे नेत असताना दुर्देवाने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर लुकमान खाने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला रुग्णालयता उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com