कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना-काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजप

या वेळच्या निवडणुकीतही भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला एका नगरसेवकाची गरज होती.
Kudal Nagar Panchyat
Kudal Nagar PanchyatSaam Tv

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग - प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उद्या मतदान होत असून राणेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेने (Shivsena) दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेस (Congress) पक्षाला नगराध्यक्ष पदासाठी पाठींबा दिला आहे. खरतर गेली पाच वर्षे या ठीकाणी भाजपची (BJP) सत्ता होती. या वेळच्या निवडणुकीतही भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला एका नगरसेवकाची गरज होती. 

हे देखील पहा -

त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादी आघाडीतून फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढवलेली कॉंग्रेस स्थानिक पातळीवर भाजपला पाठींबा देईल अशी शक्यता बोलली जात होती. भाजप कडूनही नगराध्यक्ष भाजपचाच बसेल असे दावे देखील करण्यात येत होते.मात्र भाजपचे पुन्हा सत्तेत येण्याचे मनसुबे शिवसेनेने यशस्वी होऊ दिले नाहीत आणि नगराध्यक्ष पदासाठी दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला पाठींबा देत नगराध्यक्षपदासाठीचा श्रेया गावंडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Kudal Nagar Panchyat
कृषी पपं चोरट्यांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले; तांब्याच्या वायरसाठी कृषी पपंची चोरी

त्यामुळे उद्या होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरूद्ध शिवसेना-कॉंग्रेस आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान गेली पाच वर्ष कुडाळ नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती आणि उद्या प्रत्यक्ष निवडणूकीत चमत्कार होईल आणि पुढील पाच वर्ष देखील भाजपची सत्ता येईल असा दावा भाजपने केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com