उद्या अमरावती बंद!भाजपाचे आवाहन

मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चा लोकशाहीची पायमल्ली करणारा ठरला असा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे.
उद्या अमरावती बंद!भाजपाचे आवाहन
शिवराय कुलकर्णी भाजप प्रवक्ते अरुण जोशी

*

अमरावती

त्रिपुरा येथील मस्जिद तोडफोडीच्या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी अमरावती शहरात जमात-ए-अहले सुन्नत संघटनेच्यावतीने मुस्लिम समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान काही समाजकंटकांनी जयस्तंभ चौक , चित्रा चौक परिसरातील दुकानावर दगडफेक करून प्रचंड नुकसान केले. या संपूर्ण प्रकारामुळे शहरात तणावाची परिस्थिती असून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर भारतीय जनता पक्षातर्फे उद्या शनिवार १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात संघटित गुन्हेगारीने लूटमार, तोडफोड आणि दगडफेक करून दहशत पसरवली आणि पोलिस यंत्रणा मूकदर्शक बनली होती. संपूर्ण अमरावती शहर प्रचंड दहशतीत होते. शहराला वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या. परिणामी मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चा लोकशाहीची पायमल्ली करणारा ठरला असा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी अमरावती जनतेच्या पाठीशी उभी आहे. मोर्चाच्या संघटित गुन्हेगारी निषेधार्थ सर्व व्यापारी बंधूंनी दुपारी 4 वाजेपर्यन्त दुकाने बंद ठेवावी अशी विनंती भारतीय जनता पार्टीने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com