Chandrashekhar Bawankule : सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागतच; बावनकुळेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागतच असे विधान केले आहे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Saam Tv

मुंबई - राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान पार पडले. पाच जागांपैकी सर्वत्र चर्चा होती ती नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांबाबत. नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. दरम्यान, आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागतच असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे.

Chandrashekhar Bawankule
Sanjay Raut News : संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार, शीतल म्हात्रेंच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण

"सत्यजीत तांबे भाजपमध्ये (BJP) आले तर स्वागत आहे. आमची त्यांना भाजपमध्ये घेण्याची पूर्ण तयारी आहे. सत्यजीत तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते पक्षात आले तर त्यांचे स्वागत आहे. पक्षात अनेक लोक आले आहे सत्यजीत तांबे आले किंवा इतर कुणी आले तर त्यांचे आम्ही स्वागत करु", असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Cotton Price: कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; कापूस विक्रीसाठी जाताय अन्‍य राज्‍यात

पदवीधर शिक्षक मतदानाच्या निकालात भाजप आणि युतीला जास्त यश मिळणार आहे. चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिलं होतं आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिलं आहे. त्यामुळे निकाल चांगले येणार असल्याचे त्यांनी बावनकुळे आहे.

जर सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागत आहे आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे. सत्यजित तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले आहेत. सत्यजित तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. तर सत्यजित तांबे आले तर आम्ही स्वागत करु, असे म्हणत बावनकुळेंनी तांबेंना खुली ऑफर दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com