भाजपने उदयनराजे यांची मंत्रिमंडळात स्थान न देऊन फसवणुक केली - शशिकांत शिंदे

जी माणसं आज पर्यंत छत्रपतींच्या विचारांना विरोध करत आली त्यांच्या कडून अपेक्षा ठेवण योग्य नव्हतं अशी टीका आ.शशिकांत शिंदे यांची भाजपवर केली आहे.
भाजपने उदयनराजे यांची मंत्रिमंडळात स्थान न देऊन फसवणुक केली - शशिकांत शिंदे
भाजपने उदयनराजे यांची मंत्रिमंडळात स्थान न देऊन फसवणुक केली - शशिकांत शिंदेओंकार कदम

ओंकार कदम

सातारा - उदयनराजे Udayan Raje यांना मंत्रिमंडळात स्थान न देऊन भाजपने त्यांची एक प्रकारची फसवणुक केली आहे. जी माणसं आज पर्यंत छत्रपतींच्या विचारांना विरोध करत आली त्यांच्या कडून अपेक्षा ठेवण योग्य नव्हतं अशी टीका आ.शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांची भाजपवर BJP केली आहे. BJP cheated Udayan Raje by not giving him a place in the cabinet - Shashikant Shinde

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारा नंतर आता राज्यात अनेक ठिकाणी नाराजी नाट्य सुरू आहे. या विस्तारामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता परंतु तसे झाले नाही. याबाबत बोलत असताना आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप वर जोरदार टीका केली आहे.

हे देखील पहा -

उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार होते त्यांच्या पदाचा कालावधी संपण्याआधीच त्यांनी राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केला त्या वेळी त्यांना मंत्रीपदाच्या बाबत आश्वासन दिले होते परंतु आता झालेल्या विस्तारामध्ये उदयनराजेंना स्थान दिले नसल्याने भाजपने एक प्रकारे उदयनराजेंची फसवणूकच केली असल्याचा आरोप आ.शशिकांत शिंदे यांनी केला आहे. BJP cheated Udayan Raje by not giving him a place in the cabinet - Shashikant Shinde

भाजपने उदयनराजे यांची मंत्रिमंडळात स्थान न देऊन फसवणुक केली - शशिकांत शिंदे
धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबामधील 6 जणांचा मृत्यू

तसेच ज्या पक्षाने आजपर्यंत छत्रपतींच्या विचाराचा विरोध केला आशा पक्षा कडून अपेक्षा ठेवण योग्य नव्हतं असा टोला देखील या वेळी शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे. छत्रपती शिवरायांच्या काळा पासून नेहमी काही विचारांची लोकं महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होती आणि ती आज ही करता आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. छत्रपतींच्या गादीवर अन्याय करण्याची भूमिका कोण घेत हे आता पाहायला मिळाले आहे असे देखील ते म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com