Nagpur: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक होणार 'नॉट रीचेबल'

भाजपला नगरसेवक फुटण्याची भीती; नगरसेवकांना भाजप नेणार अद्यातस्थळी
Nagpur: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक होणार 'नॉट रीचेबल'
Nagpur: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक होणार 'नॉट रीचेबल'Saam tv

नागपूर - विधान परिषदेच्या नागपूर (Nagpur) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये भाजप (BJP) आपल्या नगरसेवकांना अद्यातस्थळी नेणार आहे. या निवडणुकीत नगरसेवक फुटू नये यासाठी भाजप पुरेपूर काळजी घेत आहेत. साधारणतः 10 ते 12 दिवस नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी असतील. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, अशा ठिकाणी नगरसेवकांना ठेवलं जाणार आहे. यासाठी नगरसेवकांना चॉईस देखील दिला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

जम्मू काश्मीर, लेह लद्दाख, गोवा, हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये नगरसेवकांच्या चॉईस नुसार नगरसेवकांना ठेवलं जाणार आहे. यासाठी ग्रुप आणि ग्रुप लीडर देखील ठरविण्यात आला आहे. या नगरसेवकांना मोबाईल जवळ ठेवण्याची सुद्धा परवानगी नाही. त्यामुळे प्रभागागील समस्या कशा सुटतील हा देखील प्रश्न आहे. भाजप मात्र घोडेबाजार होऊ नये म्हणून एज्युकेशन टूर असल्याचे सांगतं आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com