
Sangli Crime News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड (corporator vijay taad) असे भाजपा नगरसेवकाचे नाव आहे. (Breaking Marathi News)
ताड यांची चार चाकी वाहन अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गाेळ्या झाडल्या. जत (jat taluka) येथील सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूल जवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी तसेच नगरसेवकाच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हल्लेखाेर पसार
या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे सध्या तरी समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सांगली एसपी जतकडे रवाना
ताड समर्थकांची घटनास्थळी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली (Sangli SP basavaraj teli) देखील जतकडे रवाना झाले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.