कोकणात भाजपाला धक्का! भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश?
कोकणात भाजपाला धक्का! भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश?Saam Tv

कोकणात भाजपाला धक्का! भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश?

देवगडचे भाजप नगरसेविका हर्षदा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोंयडे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सिंधुदुर्ग: थोड्या दिवसांपुर्वी नारायण राणेंची (Narayan Rane) जनआशिर्वाद यात्रा पार पडली. त्यात राणेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackaray) केलेली टीका आणि त्याने संपुर्ण महाराष्ट्रात झालेले वादंग ताजे असतानाच, जनआशिर्वाद यात्रेनंतर कोकणात राणेंना धक्का बसला आहे. देवगडचे दोन नगरसेवक थोड्याच वेळात शिवसेनेत करणार प्रवेश. वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनत पक्ष प्रवेश करणार आहेत.

देवगडचे भाजप नगरसेविका हर्षदा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोंयडे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वर्षा बंगल्यावर पालकमंत्री उदय सामंत ,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेला शिवसेनेचं उत्तर दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

कोकणात भाजपाला धक्का! भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश?
पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

दरम्यान नारायण राणें मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर केंद्राने आतापर्यंत ज्या योजना आणल्या, ७ वर्षात जो काही कारभार केला, त्यासंदर्भात जाऊन लोकांना विचाराव की योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? याबाबत जनआशिर्वाद यात्रा काढण्यात आली असल्याचं राणेंनी सांगितलं होतं. त्यादरम्यान मुख्यमंत्री देशाचा स्वातंत्र्यदिन विसरले अशी टिपण्णी करत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. त्याने नाशिक, पुणे, शहरात राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यावरुण राणेंना अटक झाली आणि नंतर जामीन देखील मिळाला. यासर्व प्रकरणावरुन महाराष्ट्रात अनेक चर्चा झाली. त्यानंतर आता या नगरसेवकांचा पक्ष प्रवेश म्हणजे हे भाजप आणि राणेंना उत्तर दिल्यासारखं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com