पलुस कडेगाव मध्ये भाजपला खिंडार !

पलुस कडेगाव मध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून संतगाव ग्रामपंचायतच्या सदस्यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत विलीन झाले आहेत.
पलुस कडेगाव मध्ये भाजपला खिंडार !
पलुस कडेगाव मध्ये भाजपला खिंडारविजय पाटील

सांगली : सांगलीच्या पलुस कडेगाव तालुक्यातील भाजप नेत्रुत्वाची पकड दिवसेंदिवस सैल होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप मधून ऑऊटगोईंग सुरू झाली आहे. या दुखावलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीकडे अधिक कल दिसत आहे. त्यात राष्ट्रवादीचे अरूण लाड हे पदवीधर आमदार झाल्याने त्यांच्या कडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील पहा -

आज संतगांवचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, अपर्णा सावंत, रेखा जाधव यांच्यासह युवक नेते राहुल जाधव यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आ. अरुण लाड, जि.प. सदस्य शरद लाड, नितीन नवले यांच्या उपस्थितीत कुंडल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

पलुस कडेगाव मध्ये भाजपला खिंडार
सांगलीत मंगलकार्यालयांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा

या पक्षप्रवेशाने पलुस कडेगाव मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.या पक्षप्रवेशावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com