वर्ध्यात भाजपला 'पंजा' दाखवत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.
वर्ध्यात भाजपला 'पंजा' दाखवत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
वर्ध्यात भाजपला 'पंजा' दाखवत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश Saam TV

वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. भाजपमध्ये बरेच दिवसापासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. सेवाग्राम सर्कल मधील करंजी येथे प्रभत फेरीनंतर डॉ. शिरीष गोडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, यावेळी काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे यांच्या उपस्थितीत होती.

वर्ध्यात भाजपला 'पंजा' दाखवत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
डेहराडूनमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 8 महिलांसह 11 जणांना अटक

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा पाठवला होता. डॉ. गोडे यांचे मन वळवण्यात भाजप नेत्यांना अपयश आल्याते दिसत आहे. डॉक्टर गोडे विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष असून यापूर्वी ते दोनवेळा भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. भाजपचं संघटन वाढवण्यात डॉ गोडे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. आमदार रणजित कांबळे यांच्या प्रयत्नाने, आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com