भाजपानेच ओबीसींना सर्वाधिक न्याय दिला : बावनकुळे

भाजप ओबीसी विरोधी असल्याचा आरोप करणार्‍यांना या राज्यातील ओबीसी जनताच धडा शिकविणार आहे, असा विश्वास आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.
भाजपानेच ओबीसींना सर्वाधिक न्याय दिला : बावनकुळे
Chandrashekhar BavankuleSaamTvNews

सुशांत सावंत

नागपूर : भारतीय जनता पार्टीनेच या देशात ओबीसींना सर्वाधिक न्याय दिला. ओबीसींना न्याय देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही याच पक्षाने केले. त्यामुळे भाजप (BJP) ओबीसी (OBC) विरोधी असल्याचा आरोप करणार्‍यांना या राज्यातील ओबीसी जनताच धडा शिकविणार आहे, असा विश्वास आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. देशाच्या मंत्रिमंडळात 27 पेक्षा अधिक मंत्री ओबीसी आहेत. ओबीसींना आर्थिक, शैक्षणिक व अन्य सवलती मिळाव्या म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतले आहे.

हे देखील पहा :

एवढेच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळाव्या म्हणून केंद्र शासन सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतरच ओबीसी विद्यार्थी आणि नॉन क्रिमीलेअरच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळाल्या, असे सांगताना आ. बावनकुळे म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. एवढे स्पष्ट असताना ओबीसींना आरक्षण नाकारले जाण्यास भाजपाला बदनाम करून भाजप ओबीसी विरोधी आहेत, असा आरोप काही नेते करतात. त्यांना जनता निश्चितपणे धडा शिकवेल. आरोप करणार्‍यांना कुण्या पक्षात जायचे ते जावे. पण, भाजपाला ओबीसीविरोधी म्हणणे योग्य नाही, असेही आ. बावनकुळे म्हणाले.

भाजपाने नेहमीच राजकारणात ओबीसींना मोठे करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले व न्याय दिला आहे. आजही पक्षात ओबीसींचे अनेक मोठे नेते नेतृत्व करीत आहेत व त्यांच्या नेतृत्वात पक्षाची यशस्वी आगेकूच होत आहे. पक्षाचा हा यशस्वी प्रवास आणि विकास न पाहवूनच काही नेते बेताल आरोप करीत आहेत, असेही आ. बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bavankule
बार्शीची साक्षी इंगोले मागच्या 20 दिवसांपासून गायब; चित्रा वाघ यांचा प्रशासनाला सवाल!

राऊतांची विधाने कपोलकल्पित

खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत बोलताना आ. बावनकुळे म्हणाले, संजय राऊत दिवसभर टीव्हीवर राहण्यासाठी विपरित विधाने करीत असतात. त्यांची विधाने कपोलकल्पित आहेत. त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे आता जनतेला कळले आहे.

महाविकास आघाडी सरकार सतत मागासवर्गीय व दलित समाजावर अन्याय करीत आहे. सरकारच्या अन्यायाची अनेक प्रकरणे समोर येत आहे. सरकार मागासवर्गीयांची दखलच घेत नाही. हे सरकार खर्‍या अर्थाने संवेदनशील असेल तर त्यांनी मागासवर्गीयांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवाव्या असेही आ. बावनकुळे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com