भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष; भाजपच्या माजी आमदाराचा आरोप

'चंद्रकांत पाटलांना फूस लावून चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझे निलंबन करुन घेतले.'
भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष; भाजपच्या माजी आमदाराचा आरोप
BJPSaam TV

भंडारा : भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अशी भाजप (BJP) कितीही ओरड करत असला तरी हे सर्व खोटं असून भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष असल्याची टीका भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे (Former BJP MLA Charan Waghmare) यांनी केली आहे. ते आज भंडाऱ्यांत जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण चांगलचं ढवळून निघालं आहे. भाजपमध्ये बंड झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले तर उपाध्यक्षपद भाजपकडे आले. मात्र, या सर्व राजकीय डावपेचात भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा एक गट काँग्रेससोबत गेल्याने भाजपचा पराभव झाला आणि त्यामुळे वाघमारे यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. याच पार्श्वभूमिवर आता चरण वाघमारे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर (Chandrasekhar Bavankule) गंभीर आरोप केला आहे. आपली जागा वाचविण्यासाठी बावनकुळे यांनी माझं निलंबन केल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे.

BJP
काम झाल्यावर भाजप राज ठाकरेंना वाऱ्यावर सोडेल; निलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

ते म्हणाले, विधानपरिषदेचे आमदार डॉ परिणय फूके यांच्यामुळे भंडारा-गोंदिंया जिल्ह्यातील (Bhandara-Gondinya District) राजकीय वातावरण खराब झाले होते. भाजप पक्ष श्रेष्ठींने वातावरण निवळण्यासाठी फूके यांना नागपुरला परत बोलविण्याचे ठरविले होते मात्र, फूके नागपुरला परत आल्यास आपली जागा धोक्यात येईल हे बावनकुळे यांनी ओळखले आणि आमदार फूकें यांना भंडारा-गोंदियात अडकवून ठेवण्यासाठी बावनकुळे यांनी मला निलंबित केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीला (NCP) विरोध असने हे मला निलंबित करण्याचा केवळ बहाना असल्याचा आरोपही वाघमारे यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला. तसंच चद्रकांतदादा पाटील यांना फूस लावून माझे निलंबन बावनकुळे यांनी करुन घेतल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, भाजप कितीही ओरड करत असला की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हे सर्व खोटं असून भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष असल्याची गंभीर टीकाही वाघमारे यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.