जल आक्रोश मोर्चा : पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार; फडणवीसांचा निर्धार

BJP Jan Akrosh Morcha In Aurangabad : निवडणुकीच्या तोंडावर सध्या संभाजीनगर, पाणी प्रश्न आणि औरंगजेबची कबर यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
BJP Jan Akrosh Morcha In Aurangabad Fadnavis Said we not go back without solving water issue
BJP Jan Akrosh Morcha In Aurangabad Fadnavis Said we not go back without solving water issueSaam Tv

औरंगाबाद: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादमधील पाणी प्रश्नावरुन आक्रमक झाले आहेत. औरंगाबादमध्ये (Aurangabad) आज (सोमवारी) भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाचं नेतृत्व फडणवीस (Devendra Fadnavis) करतायत. यावेळी या मोर्चाला सुरुवात झाली असून भाजप (BJP) कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, हा मोर्चा भाजपचा असला तरी यात सर्वसामान्य जनता सहभागी झाली आहे. जोपर्यंत औरंगाबादकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. (BJP Jan Akrosh Morcha In Aurangabad Fadnavis Said we not go back without solving water issue)

हे देखील पाहा -

औरंगाबाद शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू उन्हाळ्यात भाजपकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत झालं असल्याचा भाजपचा आरोप आहे. १९७२ साली टाकण्यात आलेली जायकवाडी ते औरंगाबाद ही पाईपलाईन जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी फुटते. पूर्ण क्षमतेने पाणी शहरात येत नाही. त्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने नव्याने अध्यादेश काढून योजनेचे स्वरूप बदलल्याने त्या योजनेचे काम अद्याप वेगाने होत नसल्याचंही भाजपचं म्हणणं आहे.

शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न

निवडणुकीच्या तोंडावर सध्या संभाजीनगर, पाणी प्रश्न आणि औरंगजेबची कबर यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात शहरातील पाण्याचा प्रश्न हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला १४ अटींसह परवानगी दिली आहे. पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते महापालिका असा मोर्चा काढण्याची पोलिसांनी परवानगी दिली आहे. महापालिकेच्या समोरच सभेनंतर समारोप होणार आहे.

BJP Jan Akrosh Morcha In Aurangabad Fadnavis Said we not go back without solving water issue
Viral Video : सिंहाशी मस्ती करणं आलं अंगाशी; पर्यटकाचं बोट पकडलं, झाले वांदे...

म्हणून पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक...

- औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून भाजपकडून सिडको, हडकोमध्ये आंदोलने करण्यात आली; तरीही पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला नसल्याचा भाजपचा आरोप

- शिवसेना 30 वर्षांपासून सत्तेत असताना पाणीप्रश्न सोडवला नसल्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा आरोप

- तत्कालीन फडणवीस सरकारने 2019 मध्ये 1680 कोटीची योजना मंजूर करूनही त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही, अत्यंत संथ असल्याचा भाजपचा आरोप

- महापालिका निवडणुकीसाठी संभाजीनगर आणि पाणीप्रश्न अनेक वर्षांपासून मुद्दा; त्याच मुद्द्यावर शिवसेनेची अडचण निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष सरसावले

- औरंगाबादसाठी समांतर जलवाहिनी योजना शिवसेनेमुळे पूर्ण होऊ शकली नसल्याचा सातत्याने आरोप; 15 वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली होती. पण कॉस्ट वाढल्यानं ती पूर्ण झाली नाही.

- आता भाजप - शिवसेनेत पाणीप्रश्नावरून एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू आहे.

- पोस्टर वॉर, सोशल मीडिया वॉर सुरू आहे. कुठं पोस्टर फाडाफाडी तर एकमेकांवर आरोपही सुरू आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com