
Important Meeting Of BJP: लवकरच लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात तीन दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत पुण्यात कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर आता मुंबईत देखील भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षात काही बदल होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काही संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित राहणार आहेत.
मिशन दिडशे
येत्या महापालिका नुवडणुकीसाठी भाजपने आपलं टार्गेट निश्चित केलं आहे. यावेळी गाठायचा आकडा दिडशे ठरवण्यात आला आहे. मिशन दिडशे पूर्ण करण्यासाठी पक्षात बऱ्याच हालचालींना वेग आला आहे.
मिशन गाठण्यासाठी सर्वच कार्यकर्ते कामाला लागल्याचेही दिसत आहे. दिडशे जागा जिंकून सत्ता मिळवण्यासाठी भाजपचं बूथ लेव्हलचं काम सुरु झालं आहे. तसेच आता होणाऱ्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.