मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षच राज्य करणार - आशिष शेलार

भाजपच्या सभेतून आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.
 Ashish Shelar
Ashish Shelar Saam TV

सुशांत सावंत

मुंबई : बीकेसी मैदानात शिवसेनेनं शिवसंपर्क अभियानाची सभा बीकेसी मैदानात घेतली. विरोधकांनी केलेल्या आरोपांना ठाकरी भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या या विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करुन विरोधकांचा समाचार घेतला. ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), किरिट सोमय्या यांच्यावर तोफ डागली. याच पार्श्वभूमीवर आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये भारतीय जनता पक्षाने उत्तरसभा घेतली आहे. याच सभेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार आहेत. दरम्यान, भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. शिवसेनेनं हृदयात राम आणि हाताला काम अशी घोषणा केली होती. मात्र भाजपच्या सभेतून शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचा बुलेट ट्रेन,नानार,मेट्रोला प्रकल्पाला विरोध आहे.हा कुठला हाताला काम. समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध, मग हे कसलं हाताला काम. अशा सवाल करत शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षच राज्य करेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.

 Ashish Shelar
उद्धव ठाकरेंचा कारभार हा औरंगजेबासारखा - सदाभाऊ खोत

भाजपच्या सभेत विरोधकांना टीका करताना शेलार म्हणाले, काही पक्ष आपल्या झेंड्याचा रंग बदलत आहेत. आजकाल काही पक्ष विचलित झाली आहेत.आम्ही मराठी कट्ट्याचा कार्यक्रम केला.आम्ही पोलखोल देखील सुरू केली. 200 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही केले.सत्तेत बसलेला पक्ष विकासावर बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधकांना उत्तर मिळेल. समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध मग हे कसलं हाताला काम.

औरंगजेबाच्या कबरीवर माथ टेकणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही, तर हनुमान चालीसा म्हणणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो, हे कोणते सरकार ? देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते तर आज मेट्रो लाईन सुरू झाली असती. राहुल भटचे काय झालं हे विचारतात. मग डॉ.अमरापूरकरचे काय झाले याचे उत्तर द्या. अशा शब्दांत शेलार यांनी शिवसेनवर टीका केलीय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com