त्यांची एकमेकांत ठगेगिरी सुरु आहे : आशिष शेलार

त्यांची एकमेकांत ठगेगिरी सुरु आहे : आशिष शेलार
ashish shelar

सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार ashish shelar आज रविवार (ता. ११) साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले shivendrasinhraje bhosale यांची सुरुची बंगला येथे जाऊन भेट घेतली. उभयत्यांमध्ये काही काळ विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर श्री. शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेल्या तिन्ही पक्षांचा समाचार घेतला. (bjp-leader-ashish-shelar-visits-satara-shivendrasinhraje-bhosale-political-news)

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना शेलार यांनी उत्तर दिले. यावेऴी विधिमंडळातील 12 आमदारांचे निलंबन झाले त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चूक असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती. या प्रश्नावर शेलार म्हणाले चुकले असले तर शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी पण आहे परंतु चूक झाली नसताना शिक्षा झाली तर तुम्ही त्यांना काय करणार असा प्रतिप्रश्न शेलार यांनी केला आहे. चुक नसताना शिक्षा केली तर काय करायचे तुम्ही काय करणार पवार साहेब याचे उत्तर राष्ट्रवादीला द्यावे लागेल.

शेलार म्हणाले महाविकास आघाडीने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची हिम्मत दाखवावी. भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाची इच्छा झाली असेल तर त्यात काही चूक नाही. खरतरं भास्कर जाधव यांचा वापर शिवसेनेने करून घेतला आहे. तिन्ही पक्षांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. त्यांनी घेतलेल्या एका चुकीचा निर्णयामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. आता वापरून झाल्यावर त्यांना फार काही मिळेल असे वाटत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काॅंग्रेसने स्वबळाची भाषा केली आहे. ज्येष्ठ नेेते शरद पवार यावर म्हणालेत आम्ही पक्ष एकत्र चालवित नसून सरकार एकत्र चालवित आहाेत. स्वबळाच्या प्रश्नावर आशिष शेलार म्हणाले जे स्वतःच्या (तिन्ही पक्ष) पायावरच उभे नाहीत, जे कुबड्या घेतल्या शिवाय उभे राहू शकत नाहीत त्यांनी स्वबळाची भाषा करणं हे हास्यास्पद आहे. तिन्ही पक्ष एकमेकांची फसवणूक करत आहेत.

ashish shelar
सेनेच्या आमदाराची वारक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल

नाना पटोले यांना मुख्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत. मुळात नाना पटोलेंना महाराष्ट्रातील जनता आणि काँग्रेस पक्षच गांभीर्याने घेत नाही. स्वबळाची भाषा त्यांनी केल्यावर त्यांना दिल्ली वरून मेसेज आल्याचे कळलं. आता नेहमी अभिमान स्वाभिमान आणि स्वकर्तुत्वाची भाषा करणारी शिवसेना नाना पटोलेंना काय उत्तर देते हे पहावे लागेल असा टाेला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला.

दरम्यान शेलार हे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसह नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही कानमंत्र देणार आहेत. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. त्यासाठी त्यांनी बूथबांधणी सुरू केली आहे. यामध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.

श्री. शेलार यांच्या दाै-यात जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, संघटक विट्ठल बलशेटवार, क्रीडा संघटक विकास गाेसावी आदी सहभागी हाेते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com