
मुंबई : बीकेसी मैदानात शिवसेनेनं विरोधकांच्या आरोपांना प्रतुत्यर देण्यासाठी शिवसंपर्क अभियनाची सभा घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा उल्लेख करुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शरसंधान साधलं. तसंच भाजप नेते किरीट सोमय्यांवरही त्यांनी हल्लाबोल केला. मुंबईच्या सभेत शिवसेनेची तोफ धडाडल्याने राजकीय वातावरण तापलं असून भाजप नेत्यांनीही पलटवार करायला सुरुवात केलीय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav Thackeray) टीका केलीय. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा विसर पडला आहे. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रीमंडळात ठेवले आहे,हे सुद्धा ठाकरे विसरले आहेत. असं म्हणत पाटील यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले.स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले.त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले,भाजप दाऊदला मंत्री करेल,असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला.पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रीमंडळात आहे.या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रीमंडळात कायम ठेवले आहे.
पाटील पुढे म्हणाले की, महागाईबद्दल का बोलत नाही,असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला.राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला.पण उद्धव ठाकरे विसरले की, पेट्रोल डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून त्यांचे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते. असा दिलासा गुजरात आणि इतर राज्यांनी दिला आहे.स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षण आहे.
आपल्या सरकारमुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले व ते पुन्हा मिळविण्यासाठी सरकार काहीच करत नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापली, हजारो एकरांवर अजूनही ऊस तसाच उभा आहे आणि ऊसाचे गाळप होत नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल त्यांनी उल्लेखही केला नाही. विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेने केलेले शाळांचे काम सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.