उद्धव ठाकरेंवर अशी वेळ येईल की त्यांच्यासोबत स्टेजवर केवळ चार लोक दिसतील, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबतची साथ म्हणजे शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देण्याचा प्रकार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

सांगली : भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर अशी परिस्थिती येणार आहे की त्यांच्या स्टेजवर केवळ चारच लोक दिसतील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंवर भाजपने सातत्याने टिकास्त्र सोडलं. मात्र शिंदे गटाने वेगळी भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली जाऊ लागली. (LAtest Marathi News)

Uddhav Thackeray
हळद फिटण्यापुर्वीच पत्नीने काढला पतीचा काटा; पती आवडत नसल्‍याचे कारण

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून नेहमीच हल्लाबोल केला जातो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, एक दिवस उद्धव ठाकरे यांच्यावर अशी परिस्थिती येणार की त्यांच्या स्टेजवर केवळ चारच लोक दिसतील. ते सांगलीमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबतची साथ म्हणजे शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देण्याचा प्रकार आहे. हे अनेकवेळा उद्धव ठाकरेंना आम्ही सांगितले होते, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray
Mumbai : शालेय विद्यार्थ्यांची मधुमेह तपासणी केलीच नाही; 'त्या' वृत्ताबाबत पालिकेचे स्पष्टीकरण

गजानन किर्तीकर यांच्यासारखा माणूस पक्ष सोडतो हे उद्धव ठाकरे यांनी विचार करण्यासारखे आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरी जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे यांची साथ आणखी काही नेते सोडणार आहेत.

बावनकुळेंनी राष्ट्रवादीवरही टीका केली आहे. भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती ते बरोबर आहे असं अजित पवार यांना पण आता वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण आहे; अशी अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com