Chandrashekhar Bawankule: 'भाजप- शिवसेना जागावाटप झाले नाही...' बावनकुळेंनी केला खुलासा; व्हिडिओ केला डिलीट

Maharashtra Politics: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत, अशा बातम्या समोर आल्या होत्या...
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam TV

BJP Shivsena Seats Distribution : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २०१४ मध्ये पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत, असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात आले होते. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र निवडणूक लढणार आहेत.

दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे प्रवक्ते व अन्य पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना म्हणाले होते. मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर यावर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करत असे काही ठरले नसल्याचे स्पष्ट केले आहे.. (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule
Weather Alert : अवकाळीचं संकट अजून टळलेलं नाही, राज्यासाठी पुढील ३ दिवस धोक्याचे; हवामान विभागाचा अंदाज काय?

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे...

"आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी केले होते. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल," असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
Farmer March : भाऊ गेला तरी माघार नाही, आमच्या मागण्या मान्य करा; मृत कुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांची भूमिका

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) असे वक्तव्य केल्याने चर्चा रंगली होती. शिंदे गटाला ४८ जागाच वाट्याला येणार, याबाबत चर्चा सुरू झाल्याने भाजप नेत्यांनी रात्रीच सारवासारव सुरू केली बावनकुळे यांचे भाषण समाजमाध्यमांवर टाकण्यात आले होते. पण वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत हस्तक्षेप केल्यावर हे भाषण काढून टाकण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com