
Pankaja Munde Latest News : भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं विधान केलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले "पंकजा मुंडे यांची बदनामी करणारे आणि भापज पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत. पक्षाला बदनाम करणारं एक गटच पक्षात असल्याची जाहीर कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यावरून पत्रकारांनी बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत, त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता,” असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं.
पंकजा यांना बदनाम करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलंय.पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. राज्यातले सर्व भाजपचे नेते पंकजाच्या पाठिशी आहेत असं बानवकुळे यांनी म्हंटलंय.
मात्र काही लोक त्यांच्या बोलण्याचा वेगवेगळा अर्थ काढून व्हिडिओची मोडतोड करत आहेत आणि ते व्हायरल करत आहेत. त्यामुळं मी जिल्हाध्यक्षांना त्या माणसांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत असे देखील बावनकुळे म्हणले.
पंकजा मुंडेंच्या संघटनात्मक कामाला आमचं पाठबळ आहे. राज्यातला कोणीही नेता पंकजा ताईंच्या आडवा येत नाही. देवेंद्रजी असोत मी असेन नितीनजी असतील, आम्ही सगळे पंकजा मुंडेंना मदत करणारे आहोत', असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.