Bhandara Crime: भंडाऱ्यातील सामूहिक बलात्कार पीडितेची चित्रा वाघ यांनी घेतली भेट

भाजप नेत्या चित्रा वाघ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात
Chitra wagh
Chitra waghSaam Tv

नागपूर - गोंदिया (Gondia) आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची भेट घेऊन रुग्णालय प्रशासनासोबत तिच्या प्रकृती संदर्भात बोलण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचल्या. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनासोबत संवाद साधून पीडितेच्या आरोग्यबाबत विचारपूस केली.

पीडितिची प्रकृती गंभीर असताना काही शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील काळात आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकतेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नागपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन पीडित तरुणीच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हे देखील पाहा -

मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात ३५ वर्षीय महिलेवर भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यात दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. एवढंच नाही तर, अत्याचारानंतर पीडितेला रस्त्याकाठी फेकण्यात आलं.

पीडितेवर सध्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे.

Chitra wagh
Crime News : भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन नराधमांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पहिलाआरोपी मात्र अद्याप देखील फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभीर असून सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com