हनुमान चालीसा वाचल्यावर रामाचे राज्य उलथवलं जाईल की रावणाचं? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हनुमान चालीसा वाचल्यावर रामाचे राज्य उलथवलं जाईल की रावणाचं? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Devendra FadnavisSaam Tv

मुंबई : आगामी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) मुंबईत पोलखोल सभेचं आयोजन केलं होतं. या सभेचा समारोप म्हणून भाजपने महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या सोमय्या मैदानावर बुस्टर डोस सभा घेतली आहे. या सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. हनुमान चालीसा (hanuman chalisa )वाचण्याच्या विषयावरुन फडणवीसांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा राजद्रोहाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी फडणवीस म्हणाले, हनुमान चालीसा म्हटलं तर राजद्रोहाचा गुन्हा लावला. हनुमान चालीसा म्हटल्यावर राज्य उलथवण्याचं काम केलं. असं आरोपपत्रात म्हटलं. हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथवलं जाईल की रावणाचे ? एकदा सांगा तुम्ही रामाच्या बाजुने आहेत की रावणाच्या ? असा सवाल करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

Devendra Fadnavis
राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार नाही : बाळासाहेब थोरात

फडणवीस पुढं बोलताना म्हणाले, काही लोकांना वाटतं हा महाराष्ट्र फक्त त्यांचाच आहे. परंतु हा महाराष्ट्र १८ पगड जातींचा आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही फडणवीसांनी समाचार घेतला. मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी होतो, तुम्ही कुठे होता. हा देवेंद्र फडणवीस 17 दिवस सेंट्रल जेलमध्ये होता. बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही. बाबरी पाडली तेव्हा आरोप कुणावर झाले तर भाजपच्या नेत्यांवर असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या सभेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे आदी भाजप नेते उपस्थीत होते. मागच्या दोन वर्षांपासून आघाडी सरकार राज्याला मागे नेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे. या सभेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारले आहेत. ईद राष्ट्रीय कधीपासून झाला? अक्षय तृतीयेला गावागावात शिवजयंती का साजरी होत आहे? तुम्ही शाहिस्तेखानाची बोटे आपोआप तुटली हे सांगणार आहेत का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहेत.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.