
लातूर : महाविकास आघाडी सरकारने (mva government) सत्ता स्थापन केल्यापासून विरोधी पक्ष भाजपने (bjp) शेतकऱ्यांचा प्रश्नावरुन अनेकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या गंभीर घटनांबाबतही विधीमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पुन्हा एकदा फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
लातूर मध्ये एका कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, राज्य सरकारला शेतकऱ्यांच काहीच देणं-घेणं नाहीय. कारण महाराष्ट्र म्हणजे मुंबई आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटतं. त्यामुळे शेतकऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांना काहीच वाटत नाही, असा आरोप फडणवीसांना ठाकरे यांच्यावर केला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा इथं मनरेगा ग्रामसमृद्धी अभियानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना एक नवा पैसा मिळाला नाही आपल्या सरकारच्या काळात अतिवृष्टी झाली तरीही पैसे मिळत होते. मुख्यमंत्र्यांनी सोलापूरला अतिवृष्टी काळात दौरा केला. पण रेड कारपेटच्या खाली देखील उतरले नाहीत.मुंबई बाहेर महाराष्ट्र आहेॉ, असं वाटतं नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं काय होईल,असा सवाल उपस्थित होत आहे, असंही फडणवीस म्हणाले.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.