'कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे मला माहिती आहे', फडणवीसांचा इशारा कोणाला ?

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची बैठक ताज हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली.
'कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे मला माहिती आहे', फडणवीसांचा इशारा कोणाला ?
Devendra Fadnavis Latest Marathi News, MLC Election 2022 NewsSaam Tv

मुंबई : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी उद्या २० जूनला मुंबईत निवडणूक (vidhan Parishad election) होत असून भाजपसह महाविकास आघाडीमध्ये रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून सर्वच पक्षांनी आमदारांची हॉटेलवारी केली आहे. आज मुंबईत झालेल्या शिवनेनेच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना कानमंत्र दिल्याचे समजते. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातूनही आमदारांना सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान, भाजपच्या आमदारांची बैठक ताज हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

Devendra Fadnavis Latest Marathi News, MLC Election 2022 News
'डॉन ३' का इंतजार तो...? अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची तुफान चर्चा, वाचा सविस्तर

भाजपच्या या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर खलबतं झाली. देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आमदारांनी मतदान करताना काळजी घ्यावी. कसलीही चुक होता कामा नये. उद्याच्या निवडणुकीचा विजय आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा ठरेल. कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे ही मला माहिती आहे. काहीही गोंधळ होणार नाही याचा मला विश्वास आहे.त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी. संजय कुठे, आशिष शेलार,गिरीष महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis Latest Marathi News, MLC Election 2022 News
.....तर ठाकरे सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिला इशारा

भाजपच्या बैठकीत काय झालं?

भाजप आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. 'निवडणूक कठीण आहे पण विजय अशक्य नाही', असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिला.

'मतदान करताना कुठल्याही चुका करू नका. निवडणुकीसाठी एक एक मत महत्वाचे आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही एक एक महत्वाचे आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही सामना आपण जिंकणार आहोत', असेही फडणवीसांनी सांगितले. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीवेळी केलेल्या अचूक कामगिरीचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com