...तुला सोडणार नाही; निलेश राणे कुणाला म्हणाले?

nilesh rane
nilesh rane

सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते त्यांच्या सुटकेनंतर राज्यातील भाजप आणि शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील राेष अद्याप कमी झालेला नाही. आजही राज्यातील काही भागात विशेषत: काेकणात त्याचे पडसाद उमटत आहेत. खारेपाटण येथे मंत्री राणेंच्या narayan rane स्वागतासाठी उभारण्यात आलेले स्वागत फलक फाडण्यात आले आहेत. भाजप नेते निलेश राणे nilesh rane यांनी आज (गुरुवार) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत sanjay raut यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून प्रहार केला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या विराेधात एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या हाेत्या. या तिन्ही याचिका न्यायालयाने नुकत्याच फेटाळल्या आहेत. या प्रकारावर मार्च महिन्यात खासदार राऊत यांनी संबंधित महिलेने गैरसमजुतीने माझ्यावर आराेप केल्याचे म्हटले हाेते. तसेच संबंधित महिला मला मुली सारखी असल्याचे स्पष्ट केले हाेते.

भाजप नेते यांनी आज खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत तुला साेडणार नसल्याचा इशारा दिला आहे. राणेंनी ट्विटमध्ये संज्यामुळे त्रस्त झालेली पीडीत महिला काही कारणांमुळे काेर्टात बाजू मांडू शकली नाही पण आम्ही हायर काेर्टात जाणार आहाेत. त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संज्या तुला साेडणार नाही. भाषेची वार्ता करताे , तर जी भाषा एका महिलेशी बाेलताना संज्याने वापरली आहे ती आॅडियाे क्लिप लवकरच जाहीर करताे असे म्हटले आहे.

nilesh rane
साताऱ्यात आल्या आल्या उदयनराजेंनी काढली जिप्सी अन्...

राणेंच्या दाेन्ही मुलांनी आता खासदार संजय राऊत यांना लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात राऊत आणि राणेंच्या मुलांचा शाब्दिक लढा पहायला मिळणार अशी चिन्हं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com