"लाथ मारा अशा खासदारकीला"; निलेश राणे यांचं संभाजीराजेंना आवाहन

भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंना आवाहन करणारं ट्विट केलं आहे
Nilesh Rane
Nilesh RaneSaam TV

मुंबई: सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचं (Rajyasabha Eleciton) संपूर्ण राजकारण सध्या सहाव्या जागेभोवती फिरू लागलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना वर्षा बंगल्यावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. संभाजीराजे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असल्याची चर्चा आहे. आज (सोमवार 23 मे) 12 वाजता संभाजीराजे छत्रपती वर्षावर जाणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे संभाजीराजे हातात शिवबंधन बांधणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंना आवाहन करणारं ट्विट केलं आहे. रात्रभर विचार करा, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Nilesh Rane
'याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'!'; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

काय म्हणाले निलेश राणे?

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये लिहितात, “कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला.” असे म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंना आवाहन करणारे ट्विट केले आहे.

संभाजीराजे आज वर्षावर जाणार

सुरूवातील संभाजीराजेंनी या जागेवरून अपक्ष लढण्याची हाक दिली. त्यानंतर संभाजीराजेंना शिवसेनेकडून लढण्याची हाक दिली. मात्र संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत म्हणून पाठिंबा द्या अशी मागणी केली. तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत येण्याची अट घातल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. यानंतरच छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी निमंत्रण स्वीकारलं. खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान अजून तरी राजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

संभाजीराजे मराठा समन्वयकांशी चर्चा करणार

दरम्यान, शिवसेनेनं दिलेल्या ऑफरबद्दल संभाजीराजे छत्रपती सर्व मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचा शिवसेना नेतृत्वाचा विचार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com