Pankaja Munde:'महापुरुषांच्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल, तर...'; पंकजा मुंडे यांचा नेमका रोख कुणाकडे?

'महापुरुषांच्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल तर त्या संघर्षाची थट्टा सुद्धा करता येणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्यपाल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
Pankaja Munde Latest Marathi News
Pankaja Munde Latest Marathi NewsSaam TV

Pankaja Munde News : राज्यात महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्त्यवावर भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी भाष्य केलं. (Latest Marathi News)

'महापुरुषांच्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल तर त्या संघर्षाची थट्टा सुद्धा करता येणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्यपाल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Pankaja Munde Latest Marathi News
Congress : ...तर पंतप्रधान मोदींची हत्या करा; काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान, VIDEO व्हायरल

बीडच्या परळी येथे आयोजित गोपीनाथ गडावरील, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे वाक्य, मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणापुढे हे झुकणार नाही, हे वाक्य बोलत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गर्भित इशारा दिला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'टाळ वाजवण्यासाठी सुद्धा नियम आहे. तसा देश आणि राज्य चालवण्यासाठी सुद्धा नियम असतो. टाळ वाजवण्यासाठी लय आणि रिदम महत्त्वाचा असतो. तसं विरोधकांसाठी सुद्धा नियम असतो'

'मीडियासाठी सुद्धा नियम आहेत. हे नियम कुठे तुटले असतील. त्यासाठी अर्धा तासाचे मौन बाळगले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. राजकारणात संयम लागतो तो माझ्याकडे आहे, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

'महापुरुषांविषयी बोलणं हा जन्मसिद्ध अधिकार आहे. एखाद्या व्यक्ती चांगल्या भावनेने बोलतो. एकदा शब्द खालीवर होतो. त्याची आपण वाट बघतोय आणि त्याचा आपण कुठेतरी मोठा बोभाटा करतो. हे हा सुद्धा महापुरुषाची अहवेलना आहे, असे मुंडे म्हणाल्या.

'शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती पाहून असं पाहून माझं मन खिन्न झालं. महापुरुषाविषयी वाईट बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही, आपण होतो का? त्या काळात जिवंत आपल्याला माहीत आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

Pankaja Munde Latest Marathi News
Sharad Pawar: मोदींच्या कालच्या भाषणावर शरद पवारांची टीका, नेमकं काय खटकलं? चंद्रकांत पाटलांबाबत म्हटलं...

'त्या काळात तलवारीला धार कशी द्यायची युद्ध कसं करायचं? स्वतःच्या अंगावर घाव कशी घ्यायची. तह कसं करायचं आणि कसं राहायचं. त्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल तर, त्या संघर्षाची थट्टा सुद्धा करता येणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्यपाल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com