पंकजा मुंडे म्हणून कार्यकर्त्यांना म्हणाल्या...मुर्ख कुठले! (पहा व्हिडिओ)

माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चुकीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची आज चांगलीच कानउघाडणी केली. केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या जनआशिर्वाद यात्रेला प्रारंभ करताना हा प्रकार घडला
पंकजा मुंडे म्हणून कार्यकर्त्यांना म्हणाल्या...मुर्ख कुठले! (पहा व्हिडिओ)
- पंकजा मुंडे- Saam Tv

बीड : माजी मंत्री व भाजप BJP नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी चुकीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची आज चांगलीच कानउघाडणी केली. केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड Bhagwat Karad यांच्या जनआशिर्वाद यात्रेला प्रारंभ करताना हा प्रकार घडला. BJP Leader Pankaja Munde Scolded Party Workers

भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन निघाली आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे Gopinath Munde यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन भागवत कराड यांनी या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलीये. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, या जन आशीर्वाद यात्रेला हा भाजपचा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

दरम्यान यावेळी मुंडे समर्थकांना खराडे गोपीनाथ गडावर दाखल होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. 'पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है', 'अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे' यासह अनेक घोषणा याठिकाणी देण्यात आल्या. यावेळी 'पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है' या घोषणेवरुन पंकजा मुंडे प्रचंड संतप्त झाल्या होत्या, त्यांनी कार्यकर्त्यांना झापलं. चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, भंगार अंगार या काय घोषणा देतायत, हे संस्कार आहेत का आपले, असं म्हणत संतापलेल्या पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापले.

Edited By - Amit Golwalkar

- पंकजा मुंडे
मोदी सरकारमुळे लोकशाहीच संकटात, काँग्रेसचे वासनिक कडाडले

Related Stories

No stories found.