बाबरीच्या वेळी संजय राऊत गेले होते का ? दरेकरांचा पलटवार

बाबरीच्या वेळी संजय राऊत गेले होते का ? दरेकरांचा पलटवार
Sanjay Raut- Pravin DarekarSaam TV

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरु केलेल्या पोलखोल सभेचा सोमय्या मैदानात समारोप झाला. यावेळी भाजपने बुस्टर सभा घेवून महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आंदोलनात शिवसेना कुठं होती ? असा थेट सवाल फडवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं. त्यानंतर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी फडवीसांना प्रत्युत्तर दिलं. बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती, हे तुमच्या नेत्यांना विचारा असा टोला राऊतांनी फडणवीस यांना लगावला. यावरुन आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. बाबरीच्या वेळी राऊत गेले होते का ? तलवारीशिवाय माध्यमांसमोर यायचं आणि मग आयजीच्या जीवावर बायजी उदार, अशी अवस्था आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरुन संजय राऊत यांनी काम करावं, अशी खरमरीत टीका दरेकरांनी राऊतांवर केलीय.

Sanjay Raut- Pravin Darekar
तुम्ही कधी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही; भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकरांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. पण संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. राऊतांवर टीका करताना दरेकर म्हणाले, काल जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यात आता अर्ध्या डोक्याचा हा शब्द ऍड झालाय. जी लोकं याठिकाणी नाही त्यांना विचारा असे सांगत सोयीचे बोलायचे आणि वागायचं, हे संजय राउत यांचे काम आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, श्रेयासाठी ती आमची लढाई नव्हती. आता श्रेय कुणी घ्यायचे हे कळलं. असा टोलाही राऊतांना दरेकरांनी लगावला.

दरेकर पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस शूर योद्धे आहेत. काल महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेतला. पण मुख्यमंत्र्यांनी दिशादर्शक मार्गदर्शन केलं नाही. तुम्ही का पेट्रोल डिझेल कमी करत नाही ? तुम्ही जनतेसाठी काय केले हे आधी सांगा. तुम्ही धनदांडग्यासाठी काम करत आहात. सकाळी कॅमेरा आला की टीका करण्यापेक्षा राज्याविषयी बोला. इलेक्ट्रीसिटीचे बोलत असताना राज्याची काय स्थिती आहे, आज कोळसा नाही त्यावर राज्य सरकारने बोलावं. आज राज्य अंधारात आहे पण त्यावर राऊत बोलत नाहीत. भोंग्याला वीज कोण देत यासारखी बालिश वक्तव्य करू नका.

तसंच राऊतांवर टीका करतानाच दरेकरांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही निशाणा साधला. शिवसेनेचे तीन चार भोंगे बोलत असतात. त्यात एक संजय राऊत, दुसऱ्या किशोरी पेडणेकर आणि तिसऱ्या मनीषा कायंदे. हे भोंगे फक्त मोदी आणि फडणवीस यांच्यावर बोलत असतात. चॅनलवर बोलताना घाई करू नका. संध्याकाळी देखील चॅनल सुरु असतं. दुसऱ्याच्या मुलाला कुणी आपलं नाव देतात का? डॉक्टरला माहित असतं कुणाचं आहे ते. असा जोरदार टीकाही दरेकरांनी विरोधकांवर केली.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.