Nagpur: भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी; क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यात अंपायरला मारहाण

करण यादव आणि अर्जुन याने स्कोररला मारहाण केली आहे.
Nagpur
NagpurSanjay Daff Saam Tv

संजय डाफ

Nagpur: नागपूर येथे भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने क्रिकेट सामन्यात मोठा राडा केला आहे. भाजपचे नेते मुन्ना यादव हे कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. नागपूरात सुरू आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यात त्यांचा मुलगा करण यादव आणि अर्जुन याने स्कोररला मारहाण केली आहे. (Latest Nagpur News)

नागपूरात खासदार क्रीडा मोहोत्सव अंतर्गत क्रिकेट सामने सुरू आहेत. छत्रपती नगर मैदानावर हे सामने सुरू आहेत. दरम्यान, या सामन्यात अंपायरने घेतलेल्या एका निर्णयावरून करण यादव याने वाद घातला. त्यामुळं सामन्यात गोंधळ निर्माण झाला.

Nagpur
Nagpur Crime News: वाहन पार्किंगवरून वाद; तरुणाची हत्या, दोन जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, क्रेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सदर क्रीडा महोत्सव सुरू आहे. खामला एलेव्हण आणि स्टार इलेव्हण या दोन संघामध्ये सामना रंगला होता. यामध्ये मुन्ना यादव यांची दोन्ही मुलं सहभागी होती. सदर घटनेत अर्जुनने सुरूवातीला थ्रो बॉल वरून पंचांशी वाद सुरू केला. नंतर करण याने मारहाण आणि शिवीगाळ करत मोठा गोंधळ घातला आहे.

Nagpur
Nagpur News : नागपूर पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'वर; जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात होणार कारवाई

हे प्रकरण शांत होत नाही तर सायंकाळच्या सामन्यात पुन्हा करण यादवने वाद घालत मारहाण केली आणि धमकी दिली. त्यामुळं पीडितांनी सामना रद्द करण्याची मागणी केली. मात्र आयोजकांनी या कडे दुर्लक्ष केलं आहे. सदर घटनेला २ दिवस उलटून गेले आहेत. मात्र तरी देखील करण आणि अर्जुन या दोघांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलंय. पोलीस आता यावर कारवाई करणार का? याकडे सामन्य माणसाचं लक्ष लागलंय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com