राजपुरीतील दरडग्रस्त नागरिकांना त्वरित विस्थापित करा- महेश मोहिते

दक्षिण भाजपाध्यक्ष ऍड महेश मोहिते याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे.
राजपुरीतील दरडग्रस्त नागरिकांना त्वरित विस्थापित करा- महेश मोहिते
राजपुरीतील दरडग्रस्त नागरिकांना त्वरित विस्थापित करा- महेश मोहितेराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडात Raigad गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टीने Heavy rain हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील मुरुड Murud तालुक्यातील राजपुरी Rajpuri गावात सतत दोन दिवस दरड कोसळून चार घराचे नुकसान झाले आहे. राजपुरी येथील दरडग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित हलवून त्यांना सुरक्षित स्थळी पुनर्वसन करा, भूशास्त्रज्ञ यांनी या भागाची पाहणी करावी, जिल्हा प्रशासनाने याबाबत त्वरित पावले उचलण्याची मागणी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.

हे देखील पाहा-

मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील नागरी वस्ती ही डोंगर भागात आहे. त्यामुळे येथील नागरिक दरडीच्या छत्र छायेखाली आहेत. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने राजपुरी येथे 12 आणि 19 जुलै रोजी पाच घरावर दरड कोसळून दुर्घटना झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही मात्र घरांचे नुकसान झाले आहे. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यांनी राजपुरी दरडग्रस्त भागाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे येथील नागरिकांना सुस्थळी हलविण्याची मागणी केली आहे.

राजपुरीतील दरडग्रस्त नागरिकांना त्वरित विस्थापित करा- महेश मोहिते
नागपूरात लसीकरणाकडे गर्भवती महिलांची पाठ

ऍड महेश मोहिते यांनी दरडग्रस्त नागरिकांना आपण याठिकाणाहून विस्थापित व्हावे अशी विनंती केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यासोबत ही बोलूम येथील नागरिकांच्या विस्थापितासाठी प्रयत्न करावे, त्याचबरोबर भूगर्भ शास्त्रज्ञ याचे पथक पाठवून दरड कोसळण्याची काय परिस्थिती आहे याबाबत नागरिकांना अवगत करावे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलण्याची मागणी ऍड महेश मोहिते यांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com