
Satara News : सहकारमंत्री अतुल सावे यांनी आज विराेधी पक्ष नेते अजित पवार आणि एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या महापुरुषांच्या बाबतच्या विधानाचा समाचार घेतला. सत्ता गेल्यावरच त्यांना या सगळ्या गोष्टी का आठवू लागल्या असा प्रश्न उपस्थित केला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती (savitribai phule jayanti) निमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव (जिल्हा सातारा) या जन्मगावी सहकारमंत्री अतुल सावे यांनी भेट देत फुले यांना अभिवादन केले. त्यावेळी सावे यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानावर टीका केली.
सावे यांना माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज आहेत का असा प्रश्न केला असता, सावे म्हणाले विधानसभा अध्यक्षांवर जो अविश्वासाच्या ठराव मांडण्यात आला त्या प्रस्तावावर अजित पवार यांची सही नव्हती. यावरून तुम्ही समजून घ्या काय परिस्थिती आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदु विराेधी नव्हता असे म्हटलं आहे. या प्रश्नावर अतुल सावे म्हणाले सत्ता गेल्यावरच त्यांना या सगळ्या गोष्टी का आठवू लागल्या आहेत. इतकी वर्ष सत्तेत असताना त्यानी काय केलं. या सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय आणि कुणाबद्दल बोलत आहोत.
मला एकतरी मुस्लीम परिवार दाखवा ज्याने आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवलं आहे. माझा आव्हाडांना हा कडवा प्रश्न आहे. त्याचे उत्तर त्यांनी द्यावे असे आव्हान देखील मंत्री सावे यांनी आव्हाडांना दिले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.