Amravati: 'मूर्ख आहेस का...' शिवजयंतीच्या भाषणावरुन वक्ता आणि भाजप खासदारांमध्ये जुंपली; वक्त्यानेही ठणकावले...

ज्याला ऐकायचं तो येका नसेल ऐकायचं तर चुपचाप निघून गेले तरी चालेल," अशा शब्दात खासदारांना सुणावले.
Amravati News
Amravati NewsSaamtv

अमर घटारे, अमरावती...

Shivjayanti 2023: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. यामुळे अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार कलगीतुराही रंगल्याचे पाहायला मिळाले.

अमरावतीत 19 फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंतीला आयोजित केलेल्या व्य़ाख्यान मालिकेत असाच वाद समोर आला आहे. यामध्ये भाजपाचे खासदार आणि शिव व्याख्याते यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Amravati)

Amravati News
HSC Exam 2023: बारावी परीक्षेत पहिल्याच पेपरमध्ये चूका, विद्यार्थ्यांना मिळणार आयते ६ गूण; प्रश्नांऐवजी छापून आली चक्क...

याबाबत अधिक माहिती अशी की, 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने अमरावती येथील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे, प्रमुख वक्ते म्हणून तुषार उमाळे उपस्थित होते.

यावेळी तुषार उमाळे शिवाजी महाराज यांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले गेले हे सांगत होते. यावेळी भाजपाचे जनता पार्टीचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हे शहाणपण बंद कर, मूर्ख आहे का? असे म्हणत भाषणावर हस्तक्षेप केला. ज्यामुळे वक्ते आणि भाजपा खासदारांमध्ये चांगलाद वाद झाला.

Amravati News
Vinayak Mete Car Accident Death | मेटेंच्या घराबाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमले आहेत, पाहा ही दृश्य

यावेळी वक्ते तुषार उमाळे यांनी "महाराजांचा खरा इतिहास सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिला आहे. ज्याला ऐकायचं तो येका नसेल ऐकायचं तर चुपचाप निघून गेले तरी चालेल," अशा शब्दात खासदारांना सुणावले.

हा प्रसंग सुरू असताना भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे (Anil Bonde) उठले आणि स्टेज जवळ गेले यावेळी कार्यक्रमात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वक्त्यामध्ये शिवजयंती वरून पेटलेला हा वाद काही काळाने संपला. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com