संजय राऊतांवर केलेली कारवाई सूडबुद्धीने नाही, तर....; आशिष शेलार यांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची चौकशी सुरु आहे, आशिष शेलार म्हणाले...
 Ashish Shelar
Ashish Shelar Saam TV

सुशांत सावंत

मुंबई : ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, ज्यांनी गोरेगावमधील ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला, ज्यांच्या हातांना ६७२ मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांच्या खूनाचे रक्त लागलेय, अशा उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या खासदारांची चौकशी सुरु आहे. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही, तर मराठी माणसाला फसवणाऱ्यांची सडेतोड केलेली चौकशी आहे, अशा शब्दांत भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

 Ashish Shelar
राज्यात डबल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्कम पाठिंबा, CM एकनाथ शिंदे म्हणाले...

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, गोरेगावच्या पत्रा चाळीतील मराठी कुटुंबाच्या घरांच्या स्वप्नांचा खून करण्यात शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा थेट संबंध दिसून आला आहे. सदर शासनाच्या जागेचा अपव्यय करण्यात आला. म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवर अनधिकृतपणे तिसऱ्या माणसाचा मालकी हक्क निर्माण करणे, १ हजार 39 कोटी रुपयांचा अपव्यय करणे, ६७२ मराठी कुटुंबांची घरे खाली करण्यासाठी पैशांचा, मसल पावरचा वापर करणे, त्यासाठी उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मदत करणे, नवीन बांधकामात घरे देतो, असे सांगून १३८ कोटी रुपये गोळा करून त्याचा अपव्यय करणे, त्यासाठी पुन्हा युनियन बँक ऑफ इंडियाकडून १०० कोटीचे आणि आयएलएफएसकडून २१५ कोटींचे कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पैशाचा अपव्यय करणे,त्यानंतरही प्रकल्प पूर्ण न करणे, अशा गंभीर स्वरूपाचे हे प्रकरण असून हा व्हाईट कॉलर गुन्हा आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे.

 Ashish Shelar
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार - एकनाथ शिंदे

1 कोटी आणि 60 लाख रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात आलेले दिसत आहेत. मग रोख स्वरुपात कीती आले? या पैशातून अलिबागला जमिनी खरेदी करताना रोखीने व्यवहार केल्याचे सदर जमीन मालकांनी सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्यात शिवसेनेचा थेट सहभाग दिसतोय. खा. संजय राऊत यांचा सहभाग दिसतोय याचा पक्षप्रमुखांनी खुलासा करावा,अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

गोरेगाव येथील ४८ एकर म्हाडाच्या जागेवर असणाऱ्या पत्रा चाळीतील ६७२ मराठी कुटुंबाची घरे पुनर्विकासासाठी ठक्कर या विकासकाला देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव ठक्कर या कंपनीकडून प्रवीण राऊत यांच्या गुरुआशिष या कंपनीने घेतला. मात्र २०२२ सुरु झाल्यानंतरही घरे मिळाली नाहीत. या गुरु आशिष कंपनीत प्रवीण राऊत,राकेश आणि सारंग वाधवान हे संचालक असून ४५ कोटी रुपयात पुनर्विकास करु. ठक्कर यांच्याकडून हे काम या कंपनीने सन २००७-०८ च्या दरम्यान घेतले. त्यामुळे यातील प्रोत्साहन एफएसआय आणि विक्रीचा एफएसआय या गुरु आशिषने खाजगी लोकांना विकला जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

त्यातून १ हजार ३९ कोटी रुपये मिळवले. ट्रायपार्टी एग्रीमेंट करुन यामध्ये सरकारची फसवणूक केली व हा पैसा वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून आपल्या खात्यावर वळता केला.इथेच संजय राऊत यांची एन्ट्री झाली, हिवाशांना घरे खाली करण्यासाठी, परवानग्या मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा उपयोग करुन साम,दाम,दंडभेद करुन संजय राऊत यांनी मराठी माणसांची फसवणूक केली.ते या सगळ्या मराठी कुटुंबांंच्या घरांच्या स्वप्नांचा खुन करणारे गुन्हेगार आहेत.

याच काळात खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यावरुन आल्याचे दिसत आहे.सन 2010-11 आणि 2011-12 ला वर्षा राऊत यांच्या खात्यावर 1 कोटी 60 लाख पैसे आले तर रोख रक्कम किती आली याचा शोध ईडी घेते आहे. हे पैसे का दिले प्रवीण राऊत यांनी? याच काळात संजय राऊत यांनी दादर आणि भांडूपला घर, अलिबागला मालमत्ता खरेदी कशी केली? हा पैसा कुठून आला? या प्रकरणी म्हाडाने 13 मार्च 2018 ला गुन्हा दाखल केला, त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण गेले त्यावर चौकशी झाली नाही. म्हणून तीन वर्षानंतर हे प्रकरण ईडी कडे गेले. त्यामुळे ही कारवाई सूडबुद्धीची नाही ही सडकून चौकशी आहे.

Edited By - Naresh shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com