Political News: कोण अजित पवार...? मी नुसतं बोलतोय लोकं आता जोड्याने मारतील; पडळकरांची पुन्हा जीभ घसरली

Gopichand Padalkar on Ajit Pawar: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एकदा पवारांवर सडकून निशाणा...
AJit Pawar And gopichand padalkar  Padalkar
AJit Pawar And gopichand padalkar PadalkarSaam Tv

Beed News Today: कोण अजित पवार ? असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवारांवर सडकून टीका केली आहे. मी नुसतं बोलतोय लोक आता जोड्याने मारतील. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात, तर लोकं आता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत असं म्हणत त्यांनी यावेळी अजित पवारांवर (Ajit Pawar) सडकून टीका केली. ते बीडमध्ये मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.  (Latest Marathi News)

AJit Pawar And gopichand padalkar  Padalkar
Pune Gas Leak: बेकायदा गॅस विक्री जीवावर बेतली; गॅस गळती होऊन भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

तर यावेळी संजय राऊतांबाबत विचारले असता ते म्हणाले, तुम्ही पवाराच्या घरी झाडू मारायला राहिलात, हा काय प्रकार आहे ? अरे दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान आहेत. या राष्ट्राला पुढे न्यायचं काम करतात. प्रत्येक राज्याला भरीव असा निधी देतायेत. देशाला एका अवस्थेमध्ये आणणारा पंतप्रधान इतक्या वर्षानंतर देशाला मिळालाय. जगाच्या बाजारपेठेमध्ये देशाची उंची वाढवण्याचे फार मोठे काम केले. त्यामुळे लोक काय बोलतात ? याला फार महत्व देण्याचे काही काम नाही. अस म्हणत त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली.

AJit Pawar And gopichand padalkar  Padalkar
Nashik Accident News: भरधाव टिप्परने कारला उडवलं, देवदर्शनाहून परतणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी

यावेळी गोपीचंद पडळकर यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चेवर विचारले असता ते म्हणाले की, पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आहेत आणि माननीय संघर्षयोद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या त्या मोठ्या नेत्या असल्यामुळे इतर पक्षाच्या लोकांनी काहीही चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करू नये. भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं, भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे पंकजाताईंचा विषय हा एकदम व्यवस्थितपणे चालू आहे कोणीही चिंता करण्याची गरज नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com