सेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठी नाहीत का?

सेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठी नाहीत का?
gopichand padalkar sanjay raut

सांगली : महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व  कलम ३७० चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खात आहे. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगली येथील झरे गावात पत्रकारांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत यांना बेळगावात निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? असा प्रश्न पडळकरांनी केला आहे. हे लाेकप्रतिनिधी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत त्यामुळे ते मराठी नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस कशासाठी अशी विचारणा पडळकरांनी केली आहे.

gopichand padalkar sanjay raut
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजनांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़शाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप आणि तळतळाट तुम्हांला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे असे हे पडळकरांनी सांगत किंबहूना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या ‘पेंग्वीन ‘ विकासाचा मॉडेल नाकारले आहे हे लक्षात घ्या असा टाेला हाणला.

हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता आणि इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आला आहे अशी टीका पडळकरांनी खासदार संजय राऊत gopichand padalkar sanjay raut यांच्यावर केली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com