ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसुलीचा भांडाफोड...(पहा व्हिडिओ)

चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करुन, पोलिसांकडून कन्नड घाटामध्ये केले जाणारे बेकायदेशीर वसुलीविषयी धक्कादायक खुलासा करण्यात आला
ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसुलीचा भांडाफोड...(पहा व्हिडिओ)
ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसुलीचा भांडाफोड...(पहा व्हिडिओ)Saam Tv

जळगाव : चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करुन, पोलिसांकडून कन्नड घाटामध्ये केले जाणारे बेकायदेशीर वसुलीविषयी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या घाटामधून जाणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनाकडून पोलीस बेकयादेशीरपणे पैसे घेत असल्याचे काही व्हिडीओ चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालक म्हणून या घाटात नाकाबंदीमधून जाताना कशाप्रकारे लाच द्यावी लागते, हे दाखवण्यासाठी आले आहे. हे व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.भाजपा समर्थकांनी आमदार चव्हाणांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनवरुन त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. यासंदर्भात व्हिडीओ चव्हाण यांनी शूट केले आहेत. ते सविस्तर माहितीसहीत फेसबुकवर देखील पोस्ट केले आहेत. दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटामध्ये पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येत आहे.

पहा व्हिडिओ-

यामुळे अनेकवेळा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होत असतो. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका तासंतास अडकून पडत आहेत. यामुळे पूर्ण राज्यामध्ये चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाचा स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश करण्यात आल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे. महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यात अवजड वाहनाकरिता बंद असलेले कन्नड घाटामध्ये पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करत आहेत, याचा व्हिडीओ काही दिवसाअगोदर व्हायरल झाला होता. याची खातरजमा करण्याकरिता मी माझ्या सहकाऱ्यांसह काल रात्रीच्या सुमारास वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे.

ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसुलीचा भांडाफोड...(पहा व्हिडिओ)
संतापजनक! कोल्ड ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार

यावेळी मी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला असता त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी माझ्याकडे जाताना आणि येताना ५०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यांना मी यामध्ये थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले आणि बाकीचे पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिले आहे. नंतर मी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले आणि हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले होते. तेव्हा त्यात एक पोलीस शिवीगाळ करायला सुरवात केली. मग मी देखील पोलिसांची मग्रुरी पाहून खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी मला ओळखले आणि घटना स्थळावरून त्यांनी पळ काढला आहे, असे आमदार चव्हाण यांनी घडलेल्या घटनाक्रमाविषयी बोलताना सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com