''मिरजेला दंगल काही नवीन नाही'' भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

कडक निर्बंधाला विरोध दर्शवताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे (BJP MLA Suresh Khade) यांनी हे वक्तव्य केले आहे.
''मिरजेला दंगल काही नवीन नाही'' भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
''मिरजेला दंगल काही नवीन नाही'' भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्यSaam Tv

सांगली: जर आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले तर वाद विकोपाला जाईल. आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही असे  भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कडक निर्बंधाला विरोध दर्शवताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे (BJP MLA Suresh Khade) यांनी हे  वक्तव्य केले आहे. कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासन, शासन निष्कामी झाले. शुक्रवारी दुकाने उघडणार असा इशारा  दिला आहे. सुरेश खाडे यांनी मिरज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती.

गेले कित्येक दिवस व्यापारी दुकाने उघण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. पण लॉकडाऊन कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. दोन वेळा निर्बध डावलून दुकाने उघण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला. पण पोलीस व महापालिका पथकाच्या भीतीने दुकाने पुन्हा बंद केली.

आज आमदार सुरेश खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. जिल्हा प्रशासन राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्यासाठी निष्क्रिय ठरले आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी  दुकाने उघडल्यानंतर कारवाई केली तर मिराजेसाठी दंगल नवीन नाही पुन्हा दंगल घडले असे संकेत त्यांनी दिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com