पाथर्डीत राजकीय घरफोडी, भाजप आमदाराचे दीर राष्ट्रवादीत

शिवशंकर राजळे यांची राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्कार करताना ढाकणे कुटुंबीय.
शिवशंकर राजळे यांची राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्कार करताना ढाकणे कुटुंबीय.SYSTEM

अहमदनगर : गेल्या महिनाभरापासून पाथर्डी तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले अॅड. प्रताप ढाकणे हे अॅक्टीव्ह झाले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या भाजप आमदार मोनिका राजळे यांचा विरोध कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने खेळी केली आहे. आमदार राजळे यांचे दीर शिवशंकर हे राष्ट्रवादीत गेले आहेत. राष्ट्रवादीनेही त्यांना तालुकाध्यक्ष करून सन्मान केला आहे. काहीजण याला राष्ट्रवादीने पुन्हा राजकीय घरफोडी केल्याची टीका करीत आहेत.BJP MLA's relative Shivshankar Rajale joins NCP

काही विश्लेषकांना वाटते, शिवशंकर राजळे हे स्वतःहून राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. हेच पक्षप्रवेशाचे कारण असल्याचे सांगितले जाते. एकंदरीत राजळे यांना ताकद देण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू आहे. पवार घराण्यातील वारसदार कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसाला उपस्थिती लावून राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत दिले आहेत.

शिवशंकर राजळे यांची राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्कार करताना ढाकणे कुटुंबीय.
भंडारदरा निम्मे भरले तर कोथळे ओव्हर फ्लो

तालुक्याला कोणी वाली राहिला नाही. सरकारी कार्यालयात रामभरोसे व अनियंत्रित काम सुरू आहे. त्याचा त्रास सामान्यांना सहन करावा लागतोय. लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी हे काम करायाला पाहिजे त्या काय करतात. पालिकेत सत्तांतर कारावयाचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांचा सत्कार ॲड. प्रताप ढाकणे व प्रभावती ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला. बन्सीभाऊ आठरे, गहिनीनाथ शिरसाट, बंडु बोरुडे, सीताराम बोरुडे, वैभव दहीफळे, बाळासाहेब घुले, रामराव चव्हाण, बाळासाहेब ढाकणे, स्वप्नील देशमुख, चंद्रकांत भापकर, दिगंबर गाडे, योगेश रासणे उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे संघटना पातळीवर संघटन मंदावले होते. आता शिवशंकर राजळे यांच्या रुपाने संयमी शांत व कार्यकर्त्यांचा गोतावळा जवळ असणारा अध्यक्ष मिळाला आहे. संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पालिका निवडणुकीचे नियोजन सुरू करा. BJP MLA's relative Shivshankar Rajale joins NCP

जाती-पातीचे राजकारण जनतेने ओळखले

शिवशंकर राजळे म्हणाले, जात-धर्माच्या नावाने चाललेले स्वार्थी राजकारण जनतेने ओळखले आहे. कोरोनात ॲड. प्रताप ढाकणेंनी कोरोना सेंटर सुरू केले. युवकांचे संघटन व थोरांच्या आशीर्वादावर आता पक्ष संघटन मजबुत करू. सीताराम बोरुडे यांनी प्रस्ताविक तर हुमायुन आतार यांनी सुत्रसंचालन केले. वैभव दहिफळे यांनी आभार मानले.

Edited By - Ashok Nimbalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com