औरंगाबादमध्ये पाण्यासाठीच्या आंदोलनात भाजप-मनसे एकत्र

औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नागरिक आंदोलनात उतरले आहेत.
औरंगाबादमध्ये पाण्यासाठीच्या आंदोलनात भाजप-मनसे एकत्र
Aurangabad Latest Marathi NewsSaam Tv

औरंगाबाद - पाण्यासाठीच्या आंदोलनात आज औरंगाबादमध्ये पहिल्यादा भाजप आणि मनसे एकत्र आले. भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शहरातील सिडकोने-हाडकोतील नागरिक महापालिका पाणीपुरवठ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिडको हडकोमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी येत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत, त्यामुळे सिडको हाडकोतील नागरिकानी आणि भाजप, मनसेच्या (MNS) नेते आणि कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिडकोतील पाणीपुरवठा विभागांमध्ये धडक मारून आंदोलन सुरू केले आहे. (Aurangabad Latest Marathi News)

हे देखील पाहा -

काही दिवसांपूर्वी याच भागातील लोक सिडकोतील एन 5 येथे पाण्याच्या टाक्याजवळ दिवसभर आंदोलन केले होते. त्यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, आश्वासन दिले होते. मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालाच नाहीत, शिवाय प्रत्येकाला 9 ते 10 दिवसांनंतर एकदा पाणी मिळू लागल्यामुळे आता संताप वाढला आहे. औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नागरिक आंदोलनात उतरले आहेत.

Aurangabad Latest Marathi News
बैलगाडा शर्यतीत हाणामारी; जिंकलेल्या बैलांच्या मालकाचं डोकं फोडलं

राज्यात भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दुसरीकडे औरंगाबादमध्ये झालेला राज ठाकरे यांच्या सभेनंतर स्थानिक भाजपचे नेतेही आता मनसेच्या नेत्यांना सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे. या उन्हाळ्यात पाण्यासाठी भाजपनं सिडको हाडको मध्ये आंदोलन लावून धरले आहे, त्यात आता भाजपला मनसेनेही साथ दिली आहे. महानगरपालिका प्रशासनाने कोणाचा प्रश्न सोडला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा हे मनसेच्या नेत्यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com