'देवेंद्र फडणवीसांच्या धाकामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली', अनिल बोंडेंचा निशाणा
Anil Bonde SaamTv

'देवेंद्र फडणवीसांच्या धाकामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली', अनिल बोंडेंचा निशाणा

भाजपचा विजयाचा उधळलेला गुलाल खाली येण्याआधीच राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवला.

अमर घटारे

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणुकीची (Rajyasabha election) रणधुमाळी सुरु होती. १० जूनला या निवडणुकीची मतदान प्रकिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे निकालाचा गजर वाजला. त्यानंतर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राजकीय मैदानात विजयाचं कमळ फुलवलं असल्याची बातमी समोर आली. मात्र, भाजपचा विजयाचा उधळलेला गुलाल खाली येण्याआधीच राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवला. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदार अनिल बोंडे राजकीय मैदानात उतरले आहेत.

Anil Bonde
'संजय राऊत यांचा अहंकार आडवा येतोय, सत्तेचा माज बरा नव्हे', खासदार अनिल बोंडेंचा घणाघात

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा धाक वाढला असून (mva government) महाविकास आघाडीमध्ये धाकधुक वाढली आहे, असं म्हणत बोंडे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. बोंडे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जसा विजय मिळाला तसाच विजय विधान परिषदेमध्ये मिळणार आहे.

देवेंद्र फड़णविसांचा (Devendra Fadnavis) धाक वाढला असून महाविकास आघाडी मध्ये धाकधुक वाढली आहे, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी अमरावतीमध्ये केले. दरम्यान, अमरावतीत बोंडे यांचे स्वागत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात केलं. ढोल ताशे वाजवत फटाक्यांच्या आतषबाजीत खासदार अनिल बोंडे शहरात दाखल झाले.

Anil Bonde
भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी डावलली; एकनाथ खडसे म्हणाले...

काल शनिवारी बोंडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकी केली होती. संजय राऊत यांचा अहंकार आडवा येतोय. संजय राऊतांना निवडणूक समजली नाहीय. शिवसेनेने एक नंबरची उमेदवारी संजय पवार यांना का दिली नाही? सत्तेचा माज बरा नव्हे, अशा कठोर शब्दांत बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला होता.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com