Sujay vikhe-Patil News: सावरकरांच्या मुद्द्यावरून सुजय विखे-पाटील यांचा ठाकरे गटावर निशाणा; म्हणाले....

भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSaam tv

सुशील थोरात

Sujay vikhe-Patil News : भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 'एकीकडे काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्ष वज्रमूठ यात्रा घेत असताना त्याच ठिकाणी सावरकरांचा अपमान होत आहे. इकडे सावकर आमचे आहेत म्हणून एक पक्ष स्पष्टीकरण देत आहे. तर दुसरा एक पक्ष सावरकरांबद्दल टीका करत आहे. यात विसंगती दिसून येतेय, अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली. (Latest Marathi News)

अहमदनगर शहारात आज भाजपचे वतीने मी सावरकर या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकांच्या पुतळ्यापर्यंत शहरातील विविध मार्गांवरून ही यात्रा मार्गस्थ झाली.

Sujay Vikhe Patil
Amruta Fadnavis Blackmail Case: मोठी बातमी! अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचा हार अर्पण करून या यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना सांगितले.

सुजय विखे-पाटील पुढे म्हणाले,'स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसने हे वक्तव्य केलं यावरून त्यांची स्वातंत्र्यवीरांबद्दल किती वाईट भावना आहे हे लक्षात येतं'.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना कर्जत येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. संजय राऊतांच्या वक्तव्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sujay Vikhe Patil
Unseasonal Rain In Maharashtra : अवकाळीचा सांगलीसह बार्शीतील द्राक्ष बागांना फटका; लाखाेंची गुंतवणूक मातीमोल

'मानसिकतेवर परिणाम झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत उत्तर देणे हे माझं काम नाही. त्यांनी लवकरात लवकर त्यांचा उपचार केला तर निश्चित महाराष्टामध्ये अनेक गोष्टी बदलतील. ज्यांनी आपलं वृत्तपत्र एका पक्षाकडे गहाण ठेवलेले असेल. त्यांनी वृत्तपत्र पारदर्शकतेच्या बाबतीत बोलू नये हे माझं ठाम मत आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com