Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार?, ताब्यात असलेल्या वैद्यनाथ बँकेला आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या ताब्यात असलेल्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSaam TV

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या ताब्यात असलेल्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. 24 जानेवारी रोजी कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावली असून 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Pankaja Munde
Nandurbar : जन्मापासून दोन्ही हात नाही, आई बालपणीच सोडून गेली; ८ वर्षाच्या गणेशची शिक्षणासाठी धडपड

परळी वैद्यनाथ येथे असलेली ही बँक पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात आहे. या बँकेंच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे संचालक या संचालक आहेत. उस्मानाबादच्या कळंब येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी, शर्थीचे उल्लंघन केल्याचा वैद्यनाथ बँकेवर आरोप आहे. दरम्यान, वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ रा. आर्य समाज मंदिराजवळ, परळी यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात 5 जानेवारी 2023 रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती.

तक्रारीचे अर्ज आल्याने पोलिस (Police) अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तपासाचा भाग म्हणून, दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला पोलिसांनी नोटीस पाठवली असून 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार करत वैद्यनाथ बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधिक्षक संतोष वाळके यांनी सहायक निरीक्षक सुजित बडे यांच्याकडे चौकशी सोपविली आहे. (Maharashtra Political News)

त्यानुसार चौकशीचा भाग म्हणून, अर्जातील आरोपाच्या अनुषंगाने म्हणणे सादर करण्यासाठी वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे यांना सहायक निरीक्षक बडे यांनी नोटीस बजावली आहे. तसेच 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

Pankaja Munde
Eknath Shinde : राज्यात अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

काय आहेत तक्रारदाराचे आरोप ?

सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून, संपूर्ण रक्कम जमा होण्यापूर्वी कारखान्याचा ताबा दिला. शिवाय तात्काळ बेकायदेशीररीत्या कर्ज वितरण केले. वैद्यनाथ बँकेची 65 कोटी व इतर बोजा 41 कोटी अशी एकूण 106 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असा सुभाष निर्मळ यांचा आरोप आहे.

तसेच वैद्यनाथ बँकेकडे हावरगाव ता. कळंब येथील शंभू महादेव शुगर अलाइड प्रा.लि. कारखाना गहाण होता. त्यावर वैद्यनाथ बँकेसह इतर बँकांचा बोजा होता. शंभू महादेव कारखान्याने मुदतीत कर्ज रक्कम परत न केल्याने कारखाना लिलावात काढला. मात्र, लिलाव प्रक्रियेत अटी, शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सुभाष निर्मळ यांनी केला आहे.

दरम्यान यावर वैद्यनाथ बँकेचे सीईओ विनोद खर्चे यांनी म्हटलंय, की हे प्रकरण आधीच उच्च न्यायालयात (Court) सुरु आहे. परळी शहर पोलिस ठाण्यातही संबंधितांनी तक्रार दिली होती. तेथे आम्ही आमची बाजू मांडलेली होती. आता 31 जानेवारीला आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही आमचे म्हणणे सादर करू असे विनोद खर्चे म्हणाले आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com