...तर संजय राऊतांची दांडी गुल झाली असती; प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर सडकून टीका

मुंडे समर्थकांकडून दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
...तर संजय राऊतांची दांडी गुल झाली असती; प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर सडकून टीका
Sanjay Raut- Pravin DarekarSaam TV

बीड - शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे त्यांनी राज्यसभा निवडणुकीवरून संजय राव पानभर सडकून निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की एवढी आपली वाईट अवस्था झाल्यानंतर, मला वाटतं आठवडाभर त्यांनी बडबड बंद केली पाहिजे होती.

हे देखील पाहा -

शिवसेनेचा प्रथम क्रमांकाचा उमेदवार, त्यांचा सहाव्या क्रमांकावर जिंकून येतो आणि आमचा तिसऱ्या क्रमांकाचा उमेदवार संजय राऊत पेक्षा जास्त मत घेतो. याची काही लाज शरम बाळगा. म्हणजे "आपलं काय चाललंय, एक दोन मते जरा इकडे तिकडे झाली असती, तर संजय राऊतांची दांडी उडाली असती". पण तसं काही नाही आपण बोलायचं बडबड करायची, ईडीला शिव्या घालायच्या, केंद्राला घालायच्या, आम्ही फक्त शांतपणे ऐकतोय सगळं, मात्र काय करतो हे देवेंद्रजीनी दाखवून दिलं. असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्या, त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत सडकून टीका केलीय. ते बीडमध्ये मीडियाशी बोलत होते.

Sanjay Raut- Pravin Darekar
कौतुक करताना पवारांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही - बच्चू कडू

तर बीड उस्मानाबादच्या सीमेवर प्रवीण दरेकर यांचा ताफा, मुंडे समर्थकांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दरेकर यांच्या विरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत एकप्रकारे निषेध व्यक्त केला. यावर दरेकर म्हणाले, की ते कार्यकर्ते मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी भेटून त्यांच्या भावना व्यक्त केले आहेत. ताफा वगैरे अडवला नाही. असं म्हणत त्यांनी मुंडे समर्थकांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com