राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात काँग्रेससह भाजप-शिवसेना
भाजप-शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.

राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात काँग्रेससह भाजप-शिवसेना

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घमासान सुरू आहे. आमदार संग्राम जगताप विरूद्ध काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यात हा वाद सुरू झाला आहे. काळे यांच्या मदतीला आता शिवसेनाही सरसावली आहे. नगर शहरात पोलिसांना मॅनेज करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल केले जातात. शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.

नगर शहरात शिवसेनेत दोन गट आहे. एक गट आमदार संग्राम जगताप यांच्या जवळ आहे. राष्ट्रवादीच्याच मदतीने शिवसेनेचा महापौर झाला आहे. त्यामुळे एका गटाला आमदार जगताप यांच्या वितु्ष्ट नको आहे तर दुसरा जगताप यांचा विरोध कायम ठेवायचा आहे. काँग्रेसच्या किरण काळे यांनीही शिवसेनेच्या दुसऱ्या गटाशी जुळवून घेतले आहे. त्यांच्यासाठी ते पोलिस दरबारीही धावून गेले.

भाजप-शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.
डॉक्टर तरूणीचा गर्भपात, विवाहित पोलिसाने केला प्रेमाचा घात

यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. नगर शहरामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने वारंवार विविध शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.

अनिल राठोड यांचीही आठवण

शिवसेनेचे दिवंगत नेते अनिलभैया राठोड ज्या-ज्यावेळी या शहरात कुणावरही अन्याय झाला त्या-त्या वेळी अन्यायाच्या विरोधात परखड भूमिका घेत. खोटे गुन्हे दाखल झाल्यास शिवसेना हे कदापि खपवून घेणार नाही. यापुढे ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होतील, त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन विक्रम राठोड यांनी केले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com