राजकारणात काहीही चमत्कार होऊ शकतो... विखे पाटलांचा दावा

राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य.Saam Tv News

अहमदनगर - भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात मैत्र आहे. आठ दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली होती. मात्र, आता त्यांच्यात प्रादेशिक वादावरून जुंपली आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्हा मराठवाड्याचं पाणी पळवतो, असा आरोप सत्तार यांनी केलं होता. यावर बोलतांना माजी मंत्री, भाजपा नेते विखे पाटील म्हणाले अपुऱ्या माहितीवर बोलू नये. कारण नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पाऊस पडला तर त्याचे पाणी जायकवाडी धरणाला जाते. परंतु या विषयावर प्रादेशिक वाद निर्माण करू नये, असा सल्ला विखे पाटील यांनी सत्तार यांना दिला. BJP-Shiv Sena parties may come together in future abn79

सत्तार यांना सल्ला देतानाच पारंपरिक विरोधक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीकास्त्र डागले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य.
रोहित पवारांनी भाजपला पाडले भगदाड, मोठा नेता बांधणार घड्याळ

भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री थोरात यांनी केले होते. त्यामुळे विखे पाटील यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला. स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचं अवमूल्यन होत असताना सत्तेसाठी लाचार होत ते आघाडीत रहातात. त्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. काँग्रेस पक्षाची आज काय अवस्था आहे. पक्षाचे हित पाहाण्यापेक्षा स्वतःचे हित पहाण्यात जास्त रस आहे. त्या मुळे त्यांनी मुंगेरीलाल चे स्वप्न त्यांनी पाहू नये अशी टीका बाळासाहेब थोरात यांच्यावर राधाकृष्ण विखे यांनी केली. BJP-Shiv Sena parties may come together in future abn79

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यावर विखे पाटील म्हणाले राजकारणात काहीही होऊ शकते. सध्या राज्यात महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे ही सत्तेसाठी आहे. त्यात वैचारिक भूमिका सध्या नाही. सत्ता असो किंवा नसो पारंपरिक युती शिवसेना आणि भाजपात आहे. ते एकत्र येत असतील तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. मुख्यमंत्री यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तीगत आहे. मात्र, राजकारणात कायमस्वरूपी कोणी मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. त्यामुळे चमत्कार होऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com