
Solapur BJP Leader joined Congress: सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा.अशोक निबंर्गी यांनी भाजपची साथ सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यामध्ये अशोक निबंर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कोण आहेत अशोक निंबर्गी?
प्राध्यापक अशोक निंबर्गी यांची भारतीय जनता पक्षामधील जुना व एक अभ्यासू नेता म्हणून ओळख आहे. अशोक निंबर्गी हे गेल्या ३३ वर्षांपासून सोलापूर भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची जबाबदारी आक्रमकपणे निभावली. त्यानंतर ते पक्षाचे शहराध्यक्ष होते. (Latest Marathi News)
पूर्वी ते माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक मानले जायचे. नंतर देशमुख यांच्याशी बिनसल्याने आमदार सुभाष देशमुख हे राज्याचे सहकार मंत्री झाले त्यानंतर निंबर्गी हे त्यांच्या गटात सामील झाले.
तेव्हापासून आमदार विजयकुमार देशमुख (mla vijaykumar deshmukh) यांच्या विरोधातील गट म्हणून अशोक निंबर्गी त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांकडे पाहिले जायचे. विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर ही या नेत्यांनी बराच वेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. शेवटी निंबर्गी यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेऊन त्यांनी काॅंग्रेसमध्ये (congress) अधिकृत पक्षप्रवेश केला आहे.
प्रवेशाच्या पूर्वसंध्येला त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे काही नेते त्यांच्या निवासस्थानी बसून असल्याची माहिती मिळाली आहे. निंबर्गी यांनी भाजप सोडून जाऊ नये यासाठी माजी सभागृह नेते सुरेश पाटील, हेमंत पिंगळे यासह काही कार्यकर्त्यांनी निबंर्गी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.