Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; भाजपने देशात द्वेष, हिंसा, भीती पसरवण्याचं काम केलं

विरोधक आज रस्त्यावर चालले असते तर पाच मिनिटात त्यांना स्थिती कळाली असती.
anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeraySaam TV

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७० दिवसांचा प्रवास करुन आज अकोल्यात पोहोचली आहे. अकोल्यात आज त्यांना सभेतून नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. भाजपने देशात द्वेष, हिंसा, भीती पसरवली आहे.

द्वेषाने देशाला काही फायदा होणार नाही. भीती कशाची आहे. विरोधक आज रस्त्यावर चालले असते तर पाच मिनिटात त्यांना स्थिती कळाली असती. (Latest Marathi News)

anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
PM Modi : ...तर परिणाम भोगावे लागतील!; PM मोदींचा पाकिस्तान, चीनला कडक इशारा

भारत जोडो यात्रा कशासाठी?

भारत जोडो यात्रा कशाला या विरोधकांच्या प्रश्नालाही राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. भारत जोडो यात्रा ही मन की बात करण्यासाठी नाही, तर लोकांची मनातील गोष्टी समजून घेण्यासाठी करण्यासाठी आहे, असं राहुल गांधी यांनी सांगत मोदींना टोला लगावला.

या भागात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, का केली, काय कारण होतं कोणत्याही शेतकऱ्यांना विचारा ते सांगतात आमच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. पिकविम्याचा एक रुपया नाही मिळाला. शेतकरी आत्महत्या करतो, तेही ५० हजार एक लाख रुपयांसाठी. शेतकरी विचारतात आम्ही काय चूक केली. आमचं किरकोळ कर्ज माफ होत नाही, मात्र उद्योगपतींची हजारो कोटींचं कर्ज माफ होतं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीत फूट पडू शकते?, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला हवा. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकला तर कुणीही आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांचं दुख समजलं तर ते नक्की मदत करतील.

यात्रेत अनेक तरुण भेटतात. त्याना नोकरी हवीय. मात्र त्यांना नोकरी मिळत नाहीये. मात्र या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत भाजप आपापसात भांडणं लावण्याचं काम करत आहे. याने देशाचा विकास होणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com