Uddhav Thackeray Vs Bawankule: 'उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर मोठं टीकास्त्र सोडलं आहे.
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav ThackeraySaam TV

लक्ष्मण सोळुंके

Uddhav Thackeray Vs Bawankule: दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. यातील अनेक कामे महाविकास आघाडीने पूर्वनियोजित केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर मोठं टीकास्त्र सोडलं आहे. ( Latest Uddhav Thackeray Vs Bawankule)

'विकास कामं ही उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाहीत. ते फक्त सोन्याचा चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. त्यामुळं त्यांनी या विषयावर बोलू नये, असं बावनकुळे यांनी म्हंटलंय. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात जनतेसाठी काहीच विकास कामे केली नाहीत. आमदाराच्या पत्रावर देखील ते सही करायचे नाही. तर ते विकास कामे कशी काय करू शकतात. ते विकासाचं बोलतात तेव्हा या गोष्टीचं मला वाईट वाटतं. त्यांनी कधीच मातोश्रीच्या बाहेर पाऊल ठेवले नाही. त्यांनी जो विकास केला तो कॉंट्रॅक्टर्सना पोसण्याचा विकास केला, असं बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
BJP News : भाजपने जे.पी नड्डांना पुन्हा अध्यक्ष का केलं? समोर आली मोठी कारणं...

मुंबईमध्ये सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही का केली नाही? महाराष्ट्रात मी अनेक सरकार पाहिली आहेत. कॉंग्रेसचं सकरार पाहिलं, विलासरावांचं सरकार बघितलं आहे, अशोक चव्हानांच सरकार पाहिलं देवेंद्रजींच्या सरकारात मी मंत्री होतो आताचं सरकार देखील पाहिलं उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आमदाराच्या कोणत्याच पत्रावर सही होत नव्हाती. त्यांच्या खिशात कधीच पेन नसायचा त्यामुळे त्यांनी विकास कामांवर बोलू नये, असं बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Chandrashekhar Bavankule: भाजप विधान परिषद निवडणुकीसाठी सज्ज; चंद्रशेखर बावनकुळेंनी ३ उमेदवार केले जाहीर

विरोधातील काही आमदार भाजपात येण्याच्या तयारीत

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरून देखील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. याबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, " मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील शिंदे फडणवीस सरकार येईल. तसं झाल्यास मुंबई शहराला आंतराष्ट्रीय दर्जाचे स्थान आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधातील काही आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत. बहुमत सिद्ध करायचं झालं तर आमचे १८४ आमदार भरतील, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Edited by - Ruchika Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com