पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने भाजप कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्ष जयकुमार गाेरेंनी केली हकालपट्टी

दिगंबर आगवणे यांनी भाजपातून काढून टाकण्यात आल्याची माहिती पक्षातून देण्यात आली.
Digambar Agawane
Digambar AgawaneSaam Tv

सातारा : पक्षाच्या विरोधात कायम भूमिका घेत असल्याचे कारण दाखवत भाजपाने (BJP) नुकतीच दिगंबर आगवणे (Digambar Agawane) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती (satara) संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वडणे यांनी माध्यमांना दिली. (satara latest marathi news)

वडणे म्हणाले फलटण (phaltan) तालुक्यातील दिगंबर आगवणे हे नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले. आगवणे हे काेणत्या ना काेणत्या कारणाने पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर खोटेनाटे आरोप करीत आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गाेरे यांच्या आदेशानूसार आगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Digambar Agawane
कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला..; संताेष बांगर यांचे हिंगाेलीत जंगी स्वागत

विधानसभेच्या निवडणुकीनंतर (vidhan sabha election) अनेक कार्यकर्त्यांच्या बाबत पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे देखील पक्षाच्या प्रक्रियेपासून त्यांना बाजूने करण्यात आले होते. तरीही ते सातत्याने पक्षाच्या विरोधात तसेच नेत्यांवर खोटेनाटे आरोप करीत राहिले. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे असेही वडणे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Digambar Agawane
Satara: दराेडेखाेराचा पाेलीसांवर हल्ला; एलसीबीच्या पथकाने जीवाची पर्वा न करता केले त्याला जेरबंद
Digambar Agawane
सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडे 'हे' दोन पर्याय, उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार?
Digambar Agawane
महिला विश्वकरंडक हाॅकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; फलटणच्या अक्षता ढेकळेचा समावेश
Digambar Agawane
बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल; पाच वर्षांची बंदी घालण्याची मागणी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com